निवडबार्शीमहाराष्ट्र

पत्रकार निलेश उबाळे यांची यावली वि. का. सोसायटी चा संचालक पदी बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील यावली येथील यावली विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे तत्कालीन संचालक दिगंबर उबाळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी दुय्यम निबंधक कार्यालय सहाय्य्क अधिकारी श्रीमती मुंढे यांच्या देखरेख खाली एका जागेची निवडणूक पार पडली. या जागेसाठी एकमेव निलेश उबाळे यांचा अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सोसायटी चे चेअरमन प्रा.रमेश काकडे, संचालक भागवत उकरंडे, शिवाजी उकरंडे, रघुनाथ सरवदे, सुनील काकडे, दिनकर काकडे,इन्नूस मुलाणी, विश्वनाथ शिंदे, लतिका जगताप, आदी उपस्थित होते.

या निवडीबद्दल पत्रकार उबाळे यांचे आमदार दिलीप सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, शरद कळबट, माजी सरपंच नागनाथ काकडे आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button