महाराष्ट्ररायगड

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा , कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड : जिल्ह्यातील अलिबागचा पांढरा कांदा आपल्या गोड चवीसाठी आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. या कांद्याला आंतरराष्ट्रीय भौगोलिक मानांकन (Geographical Indication – GI Tag) मिळाले आहे, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांनी कार्लेखिंड परिसरातील सांगावं येथे कांदा उत्पादक शेतकरी श्री. सतीश पाटील यांच्या शेतावर भेट देऊन कांदा बीज निर्मिती, लागवड आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याविषयी सखोल चर्चा केली.

यावेळी डॉ. गोविंदराज यांनी आश्वासन दिले की, अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button