बार्शी वकील संघाच्या निवडणुकीत अ‍ॅड. रणजीत गुंड यांचा विक्रमी मतांनी विजयी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील बार्शी वकील संघाच्या सन 2025-26 च्या निवडणुकीत वकील संघाचे अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. रणजीत नेताजी गुंड यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

यावेळी बार्शी वकील संघाचे झालेल्या अटितटीच्या लढतीमध्ये एकूण 335 मतदानापैकी 316 मतदान झाले.यामध्ये अ‍ॅड.गुंड यांना 195 मतदान झाले तर अ‍ॅड.संजय साखरे यांना 117 मतदान झाले.यात अ‍ॅड.रणजीत गुंड यांचा 78 मतांनी विजय झाला.

उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीतही रस्सीखेच पहायला मिळाली.उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड.विशाल गोणेकर,अ‍ॅड. वैभव देशमुख,अ‍ॅड. संभाजी गलांडे, अ‍ॅड. सुकुमार खामगावकर यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये अ‍ॅड. विशाल गोणेकर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

लायब्ररी चेअरमन पदासाठी अ‍ॅड.अमोल अलाट व अ‍ॅड.प्रशांत घोडके या दोघांमध्ये लढत झाली. यात अ‍ॅड.अमोल अलाट हे निवडून आले.बारच्या सचिव पदासाठी अ‍ॅड. अक्षय पाटील तर खजिनदार म्हणून अ‍ॅड. सूरज जामदार निवडून आले.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड.सुनील कुलकर्णी,अ‍ॅड.हर्षवर्धन बोधले,अ‍ॅड.ज्योतिर्लिंग नवले यांनी कामकाज पाहिले.यावेळी अ‍ॅड.रणजीत गुंडसह निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या