जयंतीबार्शीमहाराष्ट्र

छत्रपती ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त बार्शीतील तृतीयपंथी यांचा केला सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील छत्रपती ग्रुपच्या वतीने यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यंदा प्रथमच या ग्रुपच्यावतीने बार्शीतील तृतीयपंथी यांचा सन्मान करून त्यांना आरतीचा मान देण्यात आला.

सलग पंधरा वर्षे छत्रपती ग्रूप यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी बार्शीतील तृतीपंथी समुदाय यामध्ये सहभागी झाला होता. माजी नगरसेवक विजय राऊत यांच्या हस्ते तृतीपंथी यांना सन्मानाने निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीचाही मान या समुदायाला देण्यात आला. तत्पूर्वी सकाळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या अनोख्या उपक्रमाचे माजी नगरसेवक विजय राऊत यांनी छत्रपती ग्रूपचे कौतुक केले. येणाऱ्या काळात या समुदायाला आवश्यक ते सहकार्य करू असे अभिवचन त्यांनी दिले. यावेळी तृतीयपंथी किरण मस्तानी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले.

छत्रपती ग्रूपचे अध्यक्ष अजय पाटील यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमाचा उद्देश सांगितला . या कार्यक्रमासाठी तृतीपंथी समुदायाचे मार्गदर्शक सचिन वायकुळे, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राऊत, माजी नगरसेवक संदेश काकडे, पाचू उघडे तसेच रंजेश मुसळे, किरण कोकाटे, सुहास गुंड, सचिन राऊत , अमोल वाणी यांच्यासह छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button