गोदियामहाराष्ट्र

बेरोजगार व्यक्तींकरिता “सीसीटीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन व रीपेरिंग” व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण

B1न्यूज मराठी नेटवर्क500

गोंदिया, दि. 24 : बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कुडवा (गोंदिया) द्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित केले जातात. ही संस्था भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे संचालित केले जाते. स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने आजपर्यन्त 10,713 ग्रामीण व्यक्तींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 7,875 व्यक्तींनी मिळविलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे स्वयंरोजगार सुरू केला आहे.

बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींकरीता “सीसीटीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन व रीपेरिंग” या व्यवसायाचे 13 दिवसीय मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परंतु आरसेटीला कोर्स सुरू करण्याकरिता कमीत कमी 30 ते 35 उमेदवारांची गरज असते. तसेच या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची, जेवणाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे. त्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखाली कुटुंबातील इच्छुक लोकांनी जास्तीत जास्त संख्येने व लवकरात लवकर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत.500ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येइल. इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन पत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी 9834895077/8698140105/8788625680 यावर संपर्क साधावा, असे संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांनी कळविले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button