एन एम एम एस (NMMS) परीक्षेत आदर्श विद्यालयाचे यश

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्रमजीवी बहुउद्देशीय क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ, रातंजन.(ता.बार्शी) संचालित आदर्श विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखत एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 1) देशमुख शिवराज हिंदुराव 2)कु.बिले धनश्री धनाजी 3)कु.साठे श्रद्धा संतोष विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख मॅडम, भालशंकर सर, बनसोडे सर,भोसले सर, नायकल सर, दळवे सर, माळी सर, श्रीमती. आतार मॅडम, साठे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विध्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.
वैराग प्रतिनिधी – गौतम नागटिळक