दिनमहाराष्ट्रसोलापूर

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दिनांक 26 : भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, यांच्या सह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना तंबाखूमुक्ती तसेच कुष्ठरोग मुक्त बाबत शपथ दिली. प्रारंभी राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button