बार्शीसामाजिक

राहुल भड यांना वृद्य सेवा गौरव पुरस्कार जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने देण्यात येणारा वृद्य सेवा गौरव पुरस्कार गौडगाव ता. बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांना जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार येत्या १० डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे प्रदान करण्यात येणार आहे.
राहुल भड हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असून यापूर्वी त्यांना परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, गुणिजन रत्नगौरव पुरस्कार, राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार, प्रतिभा संग्राम पंढरी गौरव पुरस्कार, ग्राहक समितीच्या वतीने आदर्श पुरस्कार, स्व. जयवंत (दादा) कटमोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार विविध सामाजिक संस्था संघटना यांनी त्यांना सन्मानित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button