बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत मूकबधिर विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करून प्रिन्स गजशिव यांचा वाढदिवस साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : येथील अ‍ॅड.विवेक गजशिव यांचे चिरंजीव प्रिन्स विवेक गजशिव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बार्शी येथील निवारा बहुउद्देशीय संस्था संचालित दिलीप सोपल मूकबधिर निवासी विद्यालय बार्शी येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर व अल्पोपहार वाटप करून त्यांच्यासोबत प्रिन्स याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी येथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.राहुल पाटील, दिपक काकडे, रुपेश बंगाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रिजवाना शेख यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना वाढदिवसावर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देत मूकबधिर आणि वंचित घटकाला फायदा होईल असे उपक्रम घेतले पाहिजे असे सांगितले. 5000यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रिजवाना शेख, वाचा उपचारतज्ञ विठ्ठल शिंदे, भंडारे सर,वसतिगृह अधीक्षक योगेश जाधव, हागवने, काझी, सौ. गव्हाने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. विवेक गजशिव,अतिश बनसोडे, पंकज खूने, निखिल लंकेश्वर यांनी परिश्रम घेतले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button