पत्रकार विषयकबार्शीमहाराष्ट्र

पत्रकार पाल्यांचा सन्मान, शालेय साहित्यवाटप अन स्नेहमेळावा , बार्शीत व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रम राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांची माहिती

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि पत्रकारांच्या परिवाराचा स्नेहमेळावा शनिवारी (दि. ७) होणार असल्याची माहिती व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यउपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या पुढाकाराने सुमारे १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे.

रेल्वे स्टेशन रोडवरील माऊली लॉन्स येथे शनिवारी (ता. ७) जून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलावडे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अरुण बारबोले, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा ठोंबरे, श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पी. टी. पाटील, व्हाईस ऑफ मीडियाचे शिक्षण विंग प्रमुख चेतन कात्रे आदी उपस्थित राहणार आहेत.

दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेले पत्रकार पाल्य हर्षद आनंद शेटे (दहावी ९२ टक्के), कु. तन्वी उमेश काळे (दहावी ९० टक्के) कु. सुरभी चंद्रकांत करडे,(दहावी ८४ टक्के), कु. साक्षी प्रदीप माळी (बारावी ७८ टक्के) यांचा आणि कु. साक्षी प्रशांत काळे (फिजिओथेरपिस्ट) हिने वैद्यकीय परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे.

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेतील सदस्यांच्या पाल्यांनाच नव्हे तर शहर व तालुक्यातील इतर पत्रकारांच्या मुलांना देखील सुमारे एक लाख रुपयाचे शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे. पत्रकार नेहमीच धावपळीच्या वातावरणात वावरत असतात. त्यामुळे पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांचाही स्नेहभोजनासह मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अजित कुंकूलोळ यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षद लोहार, शाम थोरात, अस्लम काजी, अमोल आसबे प्रयत्न करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button