पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

नंदनवन संस्थेची राज्यस्तरीय आदर्श संस्था राष्ट्रीय महागौरव पुरस्कारासाठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग प्रतिनिधी : गौतम नागटिळक

वैराग : बार्शी तालुक्यातील यावली चे पत्रकार निलेश उबाळे यांच्या नंदनवन बहुद्देशीय संस्थेला नगर जिल्ह्यातील काशिनाथ आव्हाड फिल्म्स चा राज्यस्तरीय आदर्श संस्था राष्ट्रीय महागौरव पुरस्कार मिळाला असून याचे वितरण 2 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे.

नंदनवन संस्थेचा अंतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत निलेश उबाळे यांनी राज्यभरात ७ हजार पेक्षा जास्त युवक युवतीना व्यवसायाचा प्रवाहात आणले आहे तसेच मोफत गृहउद्योग प्रशिक्षण, गरजूना शालेय साहित्य वाटप, शेतकरी अभ्यास सहल, महिला उद्योग सहल, क्रीडा साहित्य वाटप, भूमिपुत्र सन्मान, आरोग्य व योग शिबीर, त्याच बरोबर मराठवाड्यातील ४००० विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आदी उपक्रम राबवले आहेत. या अगोदर डॉ. कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार, शिवकार्य गौरव पुरस्कार, आदी पुरस्कार मिळाले असून त्यांचे पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button