शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; घरात आता एकालाच मिळणार PM किसानचे पैसे

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मागच्या काळात एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे दोन ते तीन शेतकरी होते. असे बरेच कुटुंब आढळले होते. त्यामुळे यापुढे पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.