गुरुजनांसह 30 वर्षांनी भेटले मित्र मैत्रिणी

मार्च 1994- सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल मध्ये स्नेहमेळावा संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील के. एल. ई. सोसायटी,बेळगांव संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये 1994 बॅचच्या माजी विदयार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. सोलापूर, पुणे, धाराशिव, लातुर, हैद्राबाद, अहमदनगर व बार्शी शहर आणि तालुक्यातून सर्व मंडळी उत्साहाने शाळेमध्ये एकत्र आली. शाळेतील माजी मुख्याध्यापक व शिक्षक हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे प्रवेशव्दार, कार्यक्रमाचा हॉल रांगोळी व फुग्यांनी सजावट केला होता. तब्बल 30 वर्षानी भेटल्यानंतर 80 मित्र-मैत्रिणींच्या गळाभेटी, गुरुजनांना पदस्पर्श करुन आशिर्वाद सारे काही भारावून टाकणारे होते. सर्व गुरुजनांचा यथोचित सत्कार, प्रत्येकांची ओळख, यशस्वी जीवनांची माहिती, इ.पार पडली. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनी सर्वांचे स्वागत केले व के.एल.ई. संस्था व शाळेची झालेली प्रगती याबाबत माहिती दिली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एम. गणाचार्य, माजी सहशिक्षक एस.डी. जमाले, व्ही. बी. शेटे, माजी उपमुख्याध्यापिका व्ही. पी. उगाणे यांनी विदयाथ्यर्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक माजी विदयार्थी सचिन खुडे, मनिष रुगले, किरण श्रीश्रीमाळ, स्वाती जगताप, लक्ष्मी तोरड, धनंजय घोलप, हेमंत जाधव, दिपक जुगदार, बिडवे, अनंत मस्के, प्रविण घोटाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेने दिलेल्या संस्कार व ज्ञानरुपी शिदोरीमुळेच आम्ही जीवनात यशस्वी झाल्याची भावना बहुतांश विदयार्थ्यांनी व्यक्त केली. शाळेतील गुणवंत विदयार्थ्यांच्या बक्षीसासाठी एकवीस हजार रुपये कायमठेवीसाठी मुख्याध्यापकांकडे सोपविले. वर्षा रसाळ यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.