जयंतीनवी दिल्लीमहाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली , 3 : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कस्तुरबागांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनातील दर्शनी भागात आयोजित कार्यक्रमात बीड मतदारसंघाचे खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, तसेच महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या कार्यक्रमात निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विन्रम अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button