श्री.गणेश रोड मंडळाचा ” नरसिंह अवतार भक्त प्रल्हाद ” हा पौराणिक देखावा

खासदार ओमराजे निंबाळकर व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
देखावा पाहण्यासाठी उद्घाटनाच्या वेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावर्षी मंडळाचा 75 वा अमृत महोत्सवी वर्ष सोहळा
बार्शी : येथील गणेश रोड रोडगा रस्ता वरील श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश भक्तांना वेगवेगळ्या पौराणिक व धार्मिक देखावे सादर करुन आपल्या मंडळाची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले ते मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नरसिंह अवतार भक्त प्रल्हाद या देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री दिलीप सोपल, माजी पंचायत समिती सभापती अनिल डिसले, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल ,माजी नगराध्यक्ष गणेश जाधव,माजी पंचायत समिती सभापती युवराज काटे,विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, जि. प. सदस्य श्रीमंत थोरात, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल ,युवा नेते आर्यन सोपल, माजी नगरसेवक नागजी नान्नजकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व माजी मंत्री दिलीप सोपल व मान्यवरांच्या हस्ते गणेश मुर्तीची आरती करण्यात आली व फीत कापून देखाव्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते देखावा तयार केलेल्या कारागिरांचा विशेष सत्कार करण्यात आला . या मंडळाची स्थापना 1952 साली झाली असून यावर्षी मंडळ 75 वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे या मंडळाने आतापर्यंत शिवाजी महाराजांची आग्रा वरुन सुटका ,शिवराज्याभिषेक सोहळा ,तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन,बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती, पशुपतिनाथ मंदिर, गणेश जन्म ,कामदेव दहन ,दत्त जन्म ,साक्षरता अभियान ,व्यसनमुक्ती वरील देखावा,कुटूंब नियोजन देखावा ,छोटे कुटूंब – सुखी कुटुंब देखावा,श्रावण बाळ देखावा आदींसह सामाजिक व धार्मिक देखावे सादर केले आहेत यावर्षी मंडळाच्या वतीने नरसिंह अवतार भक्त प्रल्हाद हा पौराणिक व धार्मिक देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ महेश यादव यांनी सांगितले. या देखाव्याच्या माध्यमातून नरसिंह अवतार व भक्त प्रल्हाद यांच्या बद्दलची माहिती विस्तृतपणे दिली आहे या संपुर्ण देखाव्यात एकूण आठ ते दहा फायबर द्वारे निर्माण केलेल्या मूर्त्या असुन त्यांची संपूर्ण हालचाल यंत्रणा कॉम्प्युटर यंत्रणेच्या साहाय्याने करण्यात येत आहे.
देखाव्याची संकल्पना मंडळाचे मार्गदर्शक संतोष जाधवर यांची असून देखाव्याच्या निर्मितीसाठी शंकर गवळी,सागर गायकवाड ,विवेक धर्मराव,मूर्तीकार नाना पोटफोडे,श्री कृष्ण मोटे तसेच विद्युतीकरणासाठी नागजी सरवदे,सागर गाढवे आदींनी परिश्रम घेतले आहेत मंडळाने यापुर्वी सादर केलेल्या देखाव्यांसाठी पंचायत समिती व पोलीस विभागाच्या वतीने उत्कृष्ट देखावा सादरीकरण साठी गौरविण्यात आले आहे यावर्षी चा गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आदिराज यादव व पदाधिकारी हरी वायचळ, प्रथमेश वायकर, संकेत ढोले मदन कोरे,साळुंखे, मोहित परदेशी, अण्णा लिगाडे, बंडू गाढवे, अमोल वायचळ, विनोद उमाटे, विरेंद्र शिराळ अनिल मुलगे,योगेश शिराळ, विजय वाघमारे ,शकील मुल्ला, अमोल हिंगमिरे ,अतुल ठोंगे,बापु राऊत,धनंजय लिगाडे, राजु होनराव, पिंटू कांबळे,राहूल लिगाडे ,राम घोंगडे ,शंकर पाटील ,विकी हिंगमिरे, नागेश खळदे, सौरभ खळदे ,समर्थ बोते,सौरभ ढोले,विकास कवडे,शुभम केवडकर,सुशांत धळपती,संकेत ढोले,हर्षल होनराव, नागेश वायकर आदी परिश्रम घेत आहेत.