बार्शीसामाजिक

इंडीयन रेडक्रॉस सोसायटी संचलीत बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

जागतिक महिला दिना निमित्त बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीतील महिला कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अजित कुंकूलोळ, प्रा.दिलीप कराड, डॉ.बाळासाहेब देशपांडे, अशोक डहाळे व महिला कर्मचारी

बार्शी : महिला या समाजाच्या व कुटूबाच्या प्रमुख असतात समाज बांधणीत महिलांचा मोठा सहभाग असून महिला दिनानिमित्त महिलांप्रती आदर व्यक्त करत त्यांचा सन्मान करण्याचे कार्य श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी सातत्याने करत आली आहे भविष्यातही रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन रेडक्रॉस बार्शी शाखेचे सचिव अजित कुंकूलोळ यांनी केले.इंडीयन रेडक्रॉस सोसायटी संचलीत बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी बुधवारी (ता.8) साजरा करण्यात आला. यावेळी इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक डहाळे, सचिव प्रा.दिलीप कराड, वैद्यकिय अधिकारी डॉ.बाळासाहेब देशपांडे उपस्थित होते. महिला दिनानिमित्त शाह रक्तपेढीत येऊन महिलांनी रक्तदान करत महिला दिन साजरा केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी हिमोग्लोबीन, रक्तगट या तपासण्या रक्तपेढीच्या वतीने मोफत करण्यात आल्या. तसेच रक्तपेढीत कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी अनुराधा फोके, सत्यभामा गंभीरे, सुप्रिया लगदिवे ,शमा शेख यांचा रक्तपेढीच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रा.कराड यांनी केले. यावेळी त्यांनी रक्तपेढीच्या विविध उपक्रमांची व कार्यपध्दतीची माहिती दिली. आभार अशोक डहाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रक्तपेढीच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button