प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : राज्य शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे’ नामकरण करून ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे केले आहे. तसेच मंडळाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे.

दि. 20 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार आता रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांबरोबरच अॅप-आधारित कॅब, पर्यटन वाहने आणि इतर सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या चालकांनाही मंडळाचे सदस्य होता येणार आहे. यापूर्वी मंडळाच्या योजनांचा लाभ प्रामुख्याने ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांपुरताच मर्यादित होता. मात्र, आता राज्यातील सर्व पात्र प्रवासी वाहन चालकांना मंडळांतर्गत नोंदणी करता येणार आहे.500ऑनलाईन नोंदणी कशी करावी मंडळाचे सदस्यत्व घेण्यासाठी चालकांनी https://ananddighekalayankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

नोंदणी व ओळखपत्र शुल्क: रुपये 500/- – सभासद शुल्क: रुपये 300/- आवाहन सोलापूर शहर व जिल्ह्यातील रिक्षा-टॅक्सी चालक, अॅप-आधारित कॅब चालक, पर्यटन वाहन चालक तसेच इतर सर्व प्रकारच्या प्रवासी वाहन चालकांनी मंडळाचे सदस्य होऊन उपलब्ध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे संपर्क साधावा.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button