नगरपालिकानिवेदनबार्शीमहाराष्ट्र

विकासकामांची मुदत संपूनही कामे अपूर्ण, ठेकेदारांवर कारवाईची मागणी; विपक्ष नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहरातील 268 विकासकामांची मुदत संपूनही कामे पूर्ण न केल्याबाबत संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याबाबत विरोधी पक्षातील नगरसेवकांनी तक्रार केली होती. आता, या तक्रारीच्या अनुषंगाने त्याचे स्मरणपत्र आज मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांना विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांच्या वतीने देण्यात आले.50000बार्शी नगरपरिषदच्या सन 2025-26 च्या सुधारित अर्थसंकल्पात व सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात नमूद असलेल्या पान क्र. 58 ते 72, नमुना क्र. 88 मधील एकूण 268 विकासकामे विविध ठेकेदारांना देण्यात आलेली आहेत. मात्र, प्रत्यक्षात सदर कामांपैकी अनेक कामांची करारातील निश्चित मुदत संपूनही कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत, काही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी कामांची प्रगती अत्यंत संथ आहे. सदर 268 कामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्यात यावी, कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षातील नगरसेवकांच्यावतीने आज निवदेनाद्वारे करण्यात आली.5000यावेळी, विरोधी पक्षनेता नागेश अक्कलकोटे, नगरसेवक कृष्णराज बारबोले, राहुल कोंढारे, महेंदमिया लांडगे, नवनाथ माळगे, मुजमील पठाण, सचिन मांगडे, रागिनी पाचपुते, बाळासाहेब पवार, वसंत देवकर, आकाश राऊत यांच्यासह अजय भानवसे, भैरू शिंदे, सोनू नायकोजी उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button