लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना घरे उपलब्ध करून द्या – प्रहार जनशक्ती पक्षाची महापालिकेकडे मागणी…

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर शहरातील लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना घरे बांधून देणेकामी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ठराव क्र.२८२ दि.१०/१२/२०१६ रोजी ठराव करण्यात आलेला आहे. परंतु आजतागायत सदर ठरावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करण्यात आल्याने लक्ष्मी विष्णू मिल कामगार आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. गेल्या २८ वर्षापासून लक्ष्मी विष्णू मिल कामगार आपल्या हक्कासाठी लढत आहेत. महानगरपालिकेशी वारंवार पत्रव्यवहार करून अनेक निवेदने दिली, आंदोलने केली, परंतु याकडे शासन ले प्रशासनाकडून दुर्लक्षच करण्यात आल्याचा केले आहे आता तरी घरे उपलब्ध करून द्या अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहर सोलापूर येथील लक्ष्मी विष्णू मिलची जागा (नगर रचना योजना ४ अं.भू.क्र.१६४/१/अ) ही पूर्वी औद्योगिक वापर विभागात समाविष्ट होती. कालांतराने काही कारणास्तव काही मिल बंद पडली यावर उपाय म्हणून शासनाने कायदा करून ज्या ठिकाणी मिल बंद झाल्यास जागा मनपाकडे हस्तांतरित होत असते. मिल बंद झाली असेल तर आवश्यकतेनुसार रहिवास वापराकरिता द्यावी व जागेपैकी २५ टक्के जागा मनपाकडे हस्तांतरित होत असते. अशा २५ टक्के जागेवर मिल कामगारांचे पुनर्वसन करणे क्रमप्राप्त ठरत असल्याने सदर लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या घरासाठी प्रथम प्राधान्याने घरे बांधून मिळणेकामी कार्यवाही करण्यात यावी तसेच ही जागा व घरे लक्ष्मी विष्णू मिल हजेरी पटावरील पात्र कामगार यांनाच देण्यात येत आहे. अशा प्रकारचा ठराव वरील क्रमांकाप्रमाणे दि.१०/१२/२०१६ रोजी करण्यात आला असून गेल्या सात वर्षापासून या ठरावावर महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या वारसदारांचा न भरून येणारा नुकसान होत आहे. तरी याबाबत येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेऊन लक्ष्मी विष्णू मिल कामगारांसाठी राखीव असलेल्या जागेवर कामगारांना घरे देणेबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा अचानकपणे प्रहार कडून आंदोलन करावे लागेल. मग होणाऱ्या परिणामास महानगरपालिकाच जबाबदार असेल असे निवेदनात म्हंटले आहे.. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख , शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार, मिल कामगार प्रतिनिधी आदीनाथ शिंदे , कांबळे व आदी उपस्थित होते.