निवडणूकबार्शीमहाराष्ट्रसोलापूर

भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क5009

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी आज सोमवार दि. 1 जून 2026 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपरिषद निवडणुकीत भाजपला भक्कम यश मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पक्ष व कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून त्यांनी आज विधान परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.अर्ज भरण्यापूर्वी राजेंद्र राऊत यांनी भगवंतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

राजेंद्र राऊत यांंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामे, शेतकरी, महिला, युवक आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणे हे माझे पहिले कर्तव्य राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. मला खात्री आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींनी मला संधी दिली तर सोलापूरच्या प्रगतीसाठी मी 100% प्रयत्न करेन.5000यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे , शिवसेना खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख , आमदार बाळराजे देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.तेजस्विनीताई कथले, पंचायत समितीचे सभापती सौ. मिनाक्षीताई रोंगे तसेच बार्शी शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button