बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश विद्यालयाची दमदार कामगिरी; राज्य गुणवत्ता यादीत 8 वा क्रमांक

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : सुयश विद्यालय, तांदुळवाडीने सन 2025–26 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यासह जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील 60 पैकी 57 विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी 34 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे, विद्यालयाचा विद्यार्थी शौर्य परमेश्वर पवार याने 300 पैकी 254 गुण मिळवत राष्ट्रीय ग्रामीण प्रवर्गातून राज्य गुणवत्ता यादीत 8 वा क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.500तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 102 पैकी 83 विद्यार्थी पात्र ठरले असून 13 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. या दैदिप्यमान यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक नलावडे साहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप शिर्के सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.5000इयत्ता पाचवीसाठी श्रीमती सोनाली जाधव, श्रीमती मीनाक्षी राऊत, सुहास पावले व धनाजी मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता आठवीसाठी किरण मुठाळ, सुनील शिंदे, सोमनाथ पवार व श्रीमती रुपाली बोराडे यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण व दर्जेदार मार्गदर्शन करून हे यश संपादन करण्यात मोलाची भूमिका बजावली. विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सुयश विद्यालय, तांदुळवाडी शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button