बार्शीमहाराष्ट्र

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मलंगशा बाबा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : गुरुवारी संध्याकाळी वैराग येथे मलंगशा बाबा ऊर्स निमित्त मिरवणूक काढण्यात आली तदनंतर मलंगशा बाबा दर्गा येथे सलाम, फातेहाखानी, दूवा करून फुलांची चादर व संदल दर्गा चे मानकरी निंबाळकर व पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्या शनिवारी सर्व समाज बांधवासाठी जिआरत नंतर जेवणाची व्यवस्था केली आहे. खूप वर्षांपासून हिंदु-मुस्लिम समाज बांधव एकत्र येऊन ऊर्स साजरा करण्यात येतो. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मौलाना आझाद विचार मंचाचे जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल, सयाजीराव (किरण) निंबाळकर, वैजीनाथ आदमाने (नगरसेवक) भैय्या पाटील, दिग्विजय मकरंद निंबाळकर (मा.सभापती जि.प.मकरंद निंबाळकर यांचे चिरंजीव), सुरेश देशमुख, अनिल सावंत मौलाना आसिफपाशा, मौलाना कादर बेग, मौलाना रमजान, इसहाक बागवान, हसन सय्यद, जमीर शेख,जलील बागवान, इमरान बागवान, अलताफ बागवान, डॉ. महामुद शेख,हारूण शेख व इतर हिंदु-मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अफजल शेख व आभार जब्बार बागवान यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button