बार्शी टपाल कार्यालयात महिला सन्मान बचत खात्याची सुरवात

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील टपाल कार्यालयात सोमवारी कविता नागेश काळे यांनी महिला सन्मान बचत पत्र खाते उघडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून महिला बचत पत्राचे पासबुक बार्शी पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर अजितकुमार आवारे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जनसंपर्क निरीक्षक अमोल भताने , उपडाकपाल रोहित घुमरे ,डाक सहायक श्रीमती स्वाती गुडे , गणेश लंगोटे , विश्वनाथ आवारे आदि कर्मचारी उपस्थित होते.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा अर्थसंकल्पा मध्ये केली . सरकारच्या या अल्पबचत प्रमाणपत्र योजनेत महिला व मुली गुंतवणूक करू शकतात. सदर बचत पत्र ३१.०३.२०२५ पर्यंत घेता येईल , यो योजनेत कमीत कमी एक हजार आणि जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत गुंतुवणूक करता येते याची मुदत हि दोन वर्षे असेल . . तसेच या योजेनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक ७.५ % व्याजदरानुसार (चक्रवाढ पद्धतीने) परतावा मिळेल. एक महिलेच्या नावावर कमाल रु २ लाखापर्यंत कितीही बचत पत्र घेता येतील , पण दोन खात्यामधील अंतर किमान तीन महिन्याचे असले पाहिजे . तसेच एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील ४०% रक्कम काढता येईल अशी माहिती बार्शी पोस्ट ऑफिसचे जनसंपर्क निरीक्षक श्री अमोल भताने यांनी दिली तसेच महिला सन्मान बचत पत्र योजना हि महिलांसाठी अतिशय उपयुक्त योजना असून सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अमोल भताने यांनी केले.