धार्मिकबार्शीमहाराष्ट्र

गुळपोळी येथे श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार व मुर्ती प्रतिष्ठापणा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

उद्या हनुमान मंदिर जिर्णोध्दार व मुर्ती प्रतिष्ठापणा दुपारी 2 वाजता,रात्री 8 वाजता भव्य किर्तन सोहळा आयोजन

बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार व मुर्ती प्रतिष्ठापणा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि 2 डिसेंबर रोजी 2022 सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यत कार्यक्रम संपन्न होणार आहे. पालखी (मुर्ती) मिरवणूक सोहळा सकाळी 9 वाजता , मुर्तीप्रतिष्ठापणा दुपारी २ वाजता , महाप्रसाद दुपारी 2 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत , त्यानंतर भव्य किर्तन सोहळा रात्री ८ ते १० वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे.ह.भ.प.लक्ष्मण महाराज कोकाटे मठाधिपती
श्री क्षेत्र कन्हेरी देवस्थान ( काटेवाडी ) ता. बारामती यांचे हस्ते श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार व मुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत ह.भ.प.लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे किर्तन सोहळा होणार आहे.
डॉ. शरद तुकाराम चिकणे यांनी स्वखर्चातून श्री हनुमान मंदिराचे काम पूर्ण केले. सर्वत्र त्याचे कामाचे कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे स्थळ गुळपोळी ग्रामपंचायती समोर संपन्न होणार आहे. सर्व पंचक्रोशीतील लोकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन डॉ शरद तुकाराम चिकणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button