श्री शिवाजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व्याख्यानांची मालिका सुरू

कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत व परीक्षाभिमुख मार्गदर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्राचार्य प्रा. ए. बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील स्पर्धा परीक्षा व्याख्यानांची मालिका सुरू करण्यात आली आहे. केंद्राचे समन्वयक डॉ. आर. बी. पालके यांच्यासह महाविद्यालयातील विषयतज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मोफत व परीक्षाभिमुख मार्गदर्शन करीत आहेत.
व्याख्यानमालेत डॉ. आर. बी. पालके – इंग्रजी (वाक्य व त्याचे प्रकार), डॉ. एस. बी. शिंदे – भारतीय अर्थव्यवस्था, प्रा. प्रताप पाटील – लोकसंख्याशास्त्र, गणित – अंकगणितीय क्षमता, प्रा. मोटकुळे मॅडम – बुद्धिमत्ता चाचणी, डॉ. व्ही. पी. भांजे – इतिहास, प्रा. समाधान लोंढे – भारतीय संविधान, प्रा. विजय सोनवणे – भारतीय घटनेतील कलमे, प्रा. राजुरे – सामान्य भौतिकशास्त्र, प्रा. किरण खर्डेकर – संगणकाची ओळख आणि डॉ. अनंत गायकवाड – पर्यावरणशास्त्र , अजिंक्य लाडे- आनुवंशिकीशास्त्र या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रामार्फत महाविद्यालयात उपयुक्त ग्रंथसंपदा व रिडिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मोफत अभ्याससुविधा आणि परीक्षाभिमुख अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयातच अनुकूल शैक्षणिक वातावरण उपलब्ध होत आहे.




