प्रशासनमहाराष्ट्रसत्कार

महाज्योतीच्या जेईई मेन प्रशिक्षकांचा गौरव व सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क

ठाणे : महिला दिनाचे औचित्य साधून जेईई मेन्स परीक्षा प्रशिक्षण योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) प्रशिक्षकांचा व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. जेईई मेन ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी परीक्षा आहे. देशातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच जेईई मेन 2023 या परिक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे. यात महाज्योतीतर्फे राबवण्यात येत असलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील 13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी महाज्योतीला आणि जेईई मेन परीक्षा प्रशिक्षण योजने अंतर्गत ऑनलाईन शिकवत असलेल्या प्रशिक्षकांना दिलेले आहे.प्रशिक्षक पाणिनी तेलंग, नारायण शर्मा, अरविंद सिंग, साजिद अली, किर्ती देवी मुलगुंदकर, सहायक प्रशिक्षक नगमानाज ताज पठाण, पल्लवी चरणदास कुकडकर, प्रसन्न देशपांडे, संतोष गौतमचंद बोहरा, सालेहा शेख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी अधिक गुणवत्ता देण्यासाठी प्रशिक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक लेखाधिकारी जयश्री बोदेले यांनी केले. प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button