लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन भव्य पदग्रहण सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन , तेजस्विनी तसेच लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन या तीनही क्लबचा सन 2025 26 या वर्षाकरिता नूतन कार्यकारिणी सदस्य पदग्रहण सोहळा दिनांक 13 जुलैसरोजी लिंगायत बोर्डिंग बार्शी येथे पार पडला.
याप्रसंगी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल अशोक मेहता यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार दिलीप सोपल तसेच माजी आमदार राजेंद्र राऊत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास, विभागीय सभापती श्रीनिवासजी कटकुर तसेच लिओ चे मल्टिपल अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ, उपविभागीय सभापती विनोद बुडूख उपस्थित होते. सुरुवातीला मावळते अध्यक्ष महावीर कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची आढावा सचिव हेमंत जमदाडे,प्राची जमदाडे , आविश बांबोली ,यांनी सादर केला.
व्यासपीठावरील मान्यवराचे स्वागत तेजस्विनी क्लबचे अध्यक्ष सौ विद्या काळे, लिओचे गौरव देडिया यांनी केले. याप्रसंगी बोलताना अशोक मेहता यांनी आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेचा कार्याचा आढावा सांगितला तसेच बार्शीतील या तीनही क्लबच्या कार्याबद्दल गौरव उदगार काढले. नूतन अध्यक्ष लायन रवी राऊत यांनी येणाऱ्या वर्षभरामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सभागृहाला दिली. तसेच तेजस्विनी चे अध्यक्षा सौ पल्लवी बजाज यांनीही महिलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. लीओ क्लबचे अध्यक्ष तेजस रायचूरकर यांनीही येणाऱ्या वर्षभरामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आपल्या मनोगतामध्ये सांगितले. लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या विविध उपक्रमाचे कौतुक आमदार दिलीप सोपल यांनी केले, तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे कृषी प्रदर्शन पुन्हा आयोजित करण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली त्याचप्रमाणे लायन्स क्लब ची स्वतःची वास्तू होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रदीप जाधव आणि प्रकाश फुरडे यांनी करून दिला याप्रसंगी सुखाचा शोध या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास यांनी सभागृहाला आपल्या मंत्रमुग्धवाणीने प्रबोधन केले. याप्रसंगी सभागृहामध्ये बार्शीतील विविध क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना आवटे व अजित देशमुख यांनी तर आभार शितल परमार यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल सोनिग्रा,राजाभाऊ काळे ,रवी बजाज,भरत परमार, प्रीतम सुरवसे, शंभू भानुशाली यांनी विशेष परिश्रम घेतले.



