महाराष्ट्रमुंबई

कोवीडमुळे विधवा झालेल्या महिलांना महिला दिन कार्यक्रमात शिलाई यंत्राचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

ठाणे : कोवीडच्या साथीत घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या कुटुंबातील विधवा महिलांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या वतीने आज महिला दिनाचे औचित्य साधून अशा महिलांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. तसेच कोवीडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्स फंडातून यावेळी मदत देण्यात आली.जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय ठाणे व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ईश्वर सुर्यवंशी कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रेवती गायकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, बाल कल्याण समिती अध्यक्षा राणी बैसाणे तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास 500 महिला व 50 बालके उपस्थित होते. कोवीड काळात घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेल्या कुटुंबातील विधवा महिलांना महिला सबलीकरण व कल्याण योजनेअंतर्गत मदत देण्यात आली. कोवीडमध्ये दोघी पालक गमावलेल्या बालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रु. 5 लक्ष व पी.एम. केअर्स फंडातून रु. 10 लक्ष रुपयांच्या मुदत ठेवीचे वितरण करण्यात आले. यावेळी अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button