अमरावतीनिवडणूकमहाराष्ट्र

अमरावती विभाग शिक्षक निवडणूक पूर्वतयारीचाआयुक्त व निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अमरावती, दि. 19 : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी मतदान, तर मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेच्या कामकाजाचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांनी आज घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या बैठकीला अपर आयुक्त संजय जाधव, अप्पर आयुक्त सुभाष बोरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज, सह आयुक्त वासंती माळी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, माहिती उपसंचालक अनिल आलुरकर आदी अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी, विभागातील मतदान केंद्रावर स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना कोणतीही असुविधा होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपयोजना स्थानिक स्तरावर करण्यात याव्यात. मतमोजणी संदर्भात दोन प्रशिक्षण झाले आहेत तिसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात उपस्थितांना मतमोजणीवेळी आवश्यक असणाऱ्या सर्व सूचना देण्यात याव्यात.

निवडणूक मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक आदेश तातडीने काढण्यात यावे. ड्राय डे च्या संदर्भात सदर निवडणुकीसाठी असणारे निर्देशाची अंमलबजावणी करण्यात यावी. मतदान केंद्राच्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंगची व्यवस्था करण्यात यावी. याचे थेट प्रक्षेपण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात यावे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि मतपत्रिका जिल्हानिहाय वाटप करण्याची जबाबदारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार साहित्याचे वाटप तातडीने करण्यात यावे.500मतमोजणी ही सकाळपासूनच सुरू होणार असल्याने यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी नाश्ता, जेवण आदींची उत्तम व्यवस्था करण्यात यावी. या व्यवस्थेत कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. मतमोजणीच्या ठिकाणी संदिग्ध मतपत्रिकेबाबत नियुक्त जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहे. त्यासोबतच मतपत्रिका घडी करण्याच्या पद्धतीचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून तो सर्वांना उपलब्ध करून दिल्यास मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी यांना उपयोगी ठरेल.

मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉंग रूम, पिजन होल, मतपत्रिका एकत्र करणे आणि प्रत्यक्ष मतमोजणीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ नेमण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे आणि निवडणूक निरीक्षक महाजन यांनी दिल्या.

दुपारच्या सत्रात मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभाग पदवीधर, पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी कामकाजाच्या मतमोजणी कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी अमरावती विभागाची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button