निवडणूकमहाराष्ट्रसोलापूर

अंध व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : मतदानाच्या दिवशी अंध अथवा दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सहकार्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश संबंधित निवडणूक यंत्रणेला देण्यात आले आहेत.

अंध व दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सुलभता मिळावी, तसेच त्यांच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान कक्षात प्रवेशाबाबत स्पष्ट सूचना मतदारांना मदत करण्यासाठी आलेल्या मदतनीसाला किंवा सोबत्याला मतदान कक्षात प्रवेश देऊ नये. तथापि, अंध अथवा दिव्यांग मतदारांच्या बाबतीत निवडणूक संचालन नियम, 1961 मधील नियम 40-अ अंतर्गत निर्धारित तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.

आगाऊ लेखी सूचना देणे बंधनकारक

अंध अथवा दिव्यांगत्वामुळे मदतनीसाची सुविधा आवश्यक असलेल्या मतदाराने मतदानाच्या दिवसाच्या किमान तीन दिवस आधी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देणे आवश्यक आहे. अशा मतदारांना आगाऊ सूचना देण्याबाबतची माहिती त्यांच्या स्तरावर प्रसिद्ध करावी. जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

पात्रता तपासणी व मतदार यादीत नोंद प्राप्त अर्जानुसार संबंधित मतदाराची पात्रता तपासण्यात येईल. मतदार पात्र आढळल्यास मतदार यादीत त्याच्या नावासमोर नियमानुसार खूण करून नोंद घेण्यात येईल. अशा मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रांना उपलब्ध करून देण्यात यावी.

घोषणापत्र सादर करणे आवश्यक मतदानाच्या दिवशी मतदान करण्यापूर्वी संबंधित मतदाराने अंध किंवा दिव्यांग असल्याबाबतचे घोषणापत्र परिशिष्ट XI(ii)-C मधील विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्राध्यक्ष निवडणूक संचालन नियम, 1961 मधील नियम 14-A नुसार पुढील कार्यवाही करतील.500नमुना 14-A मध्ये अभिलेख ठेवण्याचे निर्देश
केंद्राध्यक्षांनी या प्रयोजनासाठी नमुना 14-अ मध्ये नियमानुसार अभिलेख (नोंदवही) ठेवावा. निवडणूक संचालन नियम, 1961 मधील नियम 40-A मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करावे. कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

अभिलेखांची छाननी व पडताळणी नमुना 14-A मधील नोंदींची इतर संबंधित कागदपत्रे, व्हिडिओ चित्रीकरणाची सीडी, सूक्ष्म निरीक्षकांचा अहवाल व केंद्राध्यक्षांच्या अहवालासह निवडणूक निरीक्षकांमार्फत छाननी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदान केंद्रांवरील नमुना 14-A पूर्ण भरलेला व स्वाक्षरीसह असल्याची खात्री करून तो विहित वेळेत संबंधित साहित्याबरोबर जमा करावा.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान वरील सूचनांचे स्पष्टपणे मार्गदर्शन करावे. सर्व मतदान केंद्रांना परिशिष्ट XI(ii)-C मधील घोषणापत्राचे नमुने आणि नमुना 14-A पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत. मदतनीस सुविधेसाठी आगाऊ प्राप्त अर्जांची यादी व पात्र मतदारांची माहिती संबंधित केंद्राध्यक्षांना उपलब्ध करून द्यावी.

मतदानानंतर नमुना 14A संकलित करून निरीक्षकांच्या छाननीसाठी उपलब्ध करून द्यावा. या सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही स्तरावर कसूर झाल्यास संबंधितांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे निर्देश सहा. निवडणूक निर्णय अधिकारी ,पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ, तथाास सहा. आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button