उद्घाटनमहाराष्ट्रलातूर

बोथी येथे नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ, ‘जलतारा’ प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

लातूर, दि. 17 : आपल्या गावात पडणारे पावसाचे पाणी आपल्याच गावात जिरविण्यासाठी प्रत्येक गावकऱ्याने जलतारा प्रकल्पासारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासारख्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे,” असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

चाकूर तालुक्यातील बोथी येथे ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाचे उद्घाटन आणि ‘जलतारा’ प्रकल्पाच्या पाहणीप्रसंगी सहकार मंत्री श्री. पाटील बोलत होते. राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग, नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स फाऊंडेशन आणि सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने या जलसंधारण कामांचा शुभारंभ सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.5000या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, सिद्धी शुगरचे कार्यकारी संचालक अविनाश जाधव, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, सरपंच बालाजी आवाळे, नाम फाऊंडेशनचे विलास चामे, टाटा मोटर्स फाऊंडेशनचे प्रमोद घायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

बोथी गावातील तीन पैकी एका नदीच्या खोलीकरणाचे काम गतवर्षीच पूर्ण झाले असून, आता दुसऱ्या नदीच्या २ किमी लांबीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला सुरुवात झाली आहे. गावात एकूण १ हजार जलतारा खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गावकऱ्यांनी आतापर्यंत ३९५ खड्डे पूर्ण केले असून, याबद्दल सहकार मंत्री पाटील यांनी गावकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले व उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.5000जलतारा प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एका एकर शेतात ५ फूट बाय ५ फूट आकाराचा एक खड्डा खोदायचा आहे. यामुळे पावसाचे लाखो लीटर पाणी थेट जमिनीत मुरते आणि भूजल पातळी वाढून हेच पाणी पुन्हा विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होते. यंदा एल निनोचे संकट येण्याची शक्यता असल्याने पाणी टंचाई भासू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाणी जमिनीत जिरविण्यासाठी आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्यासाठी पुढे आले पाहिजे. प्रत्येक गावात किमान १ हजार जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी यावेळी केले. सिद्धी शुगरचे कार्यकारी संचालक अविनाश जाधव यांनी जलतारा प्रकल्पाची माहिती दिली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button