महाराष्ट्रमुंबई

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

​मुंबई ,दि 8 : भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

​आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील.”500नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या. “नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे,” असे त्या म्हणाल्या.

“अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नानांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिले नाही. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील वंचित घटक, दुष्काळग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.कलेचा आणि सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेल्या या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button