आंदोलनबार्शी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन , पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन केली.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे, त्यामुळे शेती पिकाचे व फळबागांचे नुकसान झाले आहे.कोरोना लॉकडाऊन शेतीमालाचे पडलेले दर यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याचे या अवकाळी पावसाने कंबरडे मोडून टाकले आहे कोरोणाच्या सावटा नंतर आता कुठेतरी शेतातील द्राक्षे डाळिंब केळी टोमॅटो गहू हरभरा भाजीपाला वेलवर्गीय पिके इत्यादी मधून उत्पन्नाची आशा लावून शेतकरी कष्ट करत होता परंतु नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे द्राक्षे डाळिंब हे सेटिंग च्या कळी निघायच्या अवस्थेत असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्ण बहर वाया गेला आहे. शेतकऱ्याची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
त्यामुळे अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे कोणतेही नियम अटी न लावता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदन देऊन दिला. निवेदन महसूल उपजिल्हाधिकारी ऊदमले यांना दिले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील, दिनेश शिंदे, शरद भालेकर, अजित कोडक , रमेश कोळी , वंसत गायकवाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button