धार्मिकपुणेमहाराष्ट्र

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची केली. यावेळी त्यांनी कामाची गती गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार दिलीप वळसे- पाटील , बाबाजी काळे काळे , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.5000कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरात मोठी मान्यता असून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात मूळ मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आणि परिसर विकासाची कामे अतिशय वेगाने सुरू आहेत. मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

हेरिटेज वाडी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सुमारे दीडशे घरे नव्या ठिकाणी स्थलांतरित होत असून या नागरिकांसाठी शेजारीच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन गाव उभारण्यात येत आहे. हे गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नसून तेथील अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

500000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button