महाराष्ट्रसोलापूर

उजनी समांतर जलवाहीनीचे काम तात्काळ चालु करा : आमदार प्रणिती शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क

आमदार प्रणिती शिंदे यांचे स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त सोमपा यांना निवेदनाव्दारे सुचना

सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याकरीता 170 MLD क्षमतेचे उजनी ते सोलापूर समांतर जलवाहीनीचे काम थांबविले असल्याचे वृत्तपत्रांच्या माध्यामतून समजले. समांतर जलवाहीनी चा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरीता अत्यंत महत्वाचा असून तो तातडीने पूर्ण केला पाहिजे. सदरच्या जलवाहीनीचे काम थांबविण्याकरीता कोणत्याही न्यायालयाने स्थगिती अथवा सुचना दिलेल्या नसल्याबाबतची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सदरचे काम थांबविण्याची गरज नसताना देखिल वेळकाडूपणा कोणत्या कारणासाठी चालू आहे हे स्पष्ट होत नाही. समांतर जलवाहीनीच्या कामास कोणत्याही प्रकारची स्थगिती नसताना काम थांबविणे म्हणजे शहराच्या विकासाकामांमध्ये अडथळा आणला जात आहे. जलवाहीनीचे थांबविलेले काम तात्काळ चालू करण्यात यावे अथवा कोणत्या वैद्य कारणामुळे स्मार्ट सिटी कंपनीने सदरचे काम थांबविलेले याचा खुलासा होणे गरजेचे आहे. सोलापूर शहरवासियांच्या दृष्टीकोनातून महत्वाचा असल्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून उजनी समांतर जलवाहीनीचे काम तात्काळ चालु करण्यात यावे याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांचे स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त सोमपा यांना निवेदनाव्दारे सुचना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button