उद्घाटनबार्शीमहाराष्ट्रशिबीर

पांगरी येथे श्रीराम तरुण गणेश मंडळाचे रक्तदान शिबिर; विजय गरड व सुहास देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

B1 न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गणेशोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पांगरी येथील श्रीराम तरुण गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड आणि पांगरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

रक्तदान शिबिराला पांगरी गावातील तरुण व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदायी मदत मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.500मंडळाचे कार्यकर्ते दिपक शेळके यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र उत्सवासोबत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे हे मंडळाचे कर्तव्य असून, सध्या जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून संकलित होणारे रक्त अनेक गरजू रुग्णांसाठी उपयोगी पडेल. यापुढेही मंडळाच्या वतीने असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात,” असा संदेश देत नागरिकांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उद्योजक निळकंठ शेळके, गणेश घावटे, डॉ. आरिफ शेख, माजी सरपंच बाळासाहेब मोरे (मेजर), मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र गाढवे, दिपक शेळके, सागर भराडे, अक्षय चव्हाण, मनोज मोरे, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button