कृषीमहाराष्ट्रयोजनासोलापूर

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती, कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, पॉलीहाऊससह विविध योजनांची दिली माहिती

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमांतर्गत आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मोहोळ येथे गणेशभक्त व ग्रामस्थांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, महाडीबीटी पोर्टल, महिला शेतकरी, ठिबक सिंचन, पॉलीहाऊस, कांदा चाळ, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आदी योजनांचा समावेश होता.

शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधून योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेबाबत माहिती घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

विस्तार अधिकारी सुदाम वसेकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञाही देण्यात आली.500कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माहिती कार्यालयाचे शरद नलवडे यांनी केले. तर समारोप मोहोळ वार्ताचे संपादक राजू साखरे यांनी केला.

बाप्पा डॉट ओआरजी(bappa.org)

राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ही राज्यातील गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा चे दस्तावेजीकरण करण्यासाठी bappa.org यावर गणेश मंडळांनी त्यांच्या गणेश मंडळाची माहिती, फोटो, रील्स तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी ही त्यांच्या घरातील गणपती चे फोटो, रिल्स अपलोड करण्याबाबतचे आवाहन केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी हनुमंत गावडे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी निखिल देशमुख, विस्तार अधिकारी सुदाम वसेकर, मंडळाचे मार्गदर्शक चंद्रकांत देवकाते यांच्यासह गणेशभक्त, ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button