बार्शीमहाराष्ट्र

बार्शी तालुक्यातील कव्हे येथे विजेच्या धक्क्याने व झाड अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : बार्शी तालुक्यातील कव्हे गावाच्या शिवारात मंगळवार आज दि. 23/06/2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विज पडून लिंबाचे झाड अंगावर पडल्याने 47 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कव्हे ता. बार्शी येथील रहिवासी रत्नमाला रामा चौधरी वय 47 या बार्शी-मोहोळ रस्त्याच्या दक्षिण बाजूला राजाराम रामलिंग तिकटे यांच्या शेताजवळ रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडाखाली बसल्या होत्या. अचानक आलेल्या वादळामुळे त्या झाडावर विज कोसळली आणि पूर्ण झाड त्यांच्या अंगावर कोसळले.5000ही माहिती गावातील अमित बाबुराव पाटील यांनी फोनवरून रत्नमाला यांचे पुतणे महेंद्र सुब्राव चौधरी वय 40 यांना दिली. महेंद्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्या चुलती रत्नमाला या झाडाखाली अडकलेल्या दिसल्या. तातडीने गावचे पोलीस पाटील यांना कळवून जेसीबीच्या साहाय्याने गावकऱ्यांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आले.

जखमी अवस्थेतील रत्नमाला यांना खाजगी वाहनातून बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.5000मयत रत्नमाला चौधरी ह्या कव्हे येथील रहिवासी असून शेती करणाऱ्या कुटुंबातील होत्या. या घटने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुतणे महेंद्र चौधरी यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खबरी जबाब दिला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

लग्नसराई आणि शेतकामाच्या काळात शेतशिवारात वादळ आल्यास झाडाखाली, मोकळ्या मैदानात थांबू नये, असा इशारा हवामान विभाग व प्रशासनाकडून वारंवार दिला जातो. या घटनेमुळे तो पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अमित गाडगे करत आहेत.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button