बार्शी

सावरगांव येथे 76 लोकांचे लसीकरण

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी तालुक्यातील सावरगांव येथे 76 लोकांचे लसीकरण करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोराणाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करून घेणे महत्त्वाचे असल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला प्राथमीक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या सावरगांव येथे 76 तर लोकांनी लस घेतली.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी ओंकार ओमन , आरोग्य सेवक दत्तात्रय काशीद , आरोग्य सेविका माधुरी लोंढे, शिक्षक भोसले सर ,ग्रामसेवक राहुल तायडे , कृष्णा बचुटे , मोहन गरजे , किशोर रणदिवे , ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश गाडेकर, संगणक परिचालक प्रतिभा खरात, आशा सेविका मनीषा करडे ,आदीजण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button