प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

ईद-ए-मिलाद सणानिमित्त बार्शी शहरात रूट मार्च व दंगा काबू प्रात्यक्षिक; पोलिस यंत्रणा सज्ज

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी (२५ ऑगस्ट) शहरात रूट मार्च तसेच दंगा काबू प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.

बार्शी शहरातील संवेदनशील भागातून पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन केले. या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालासाहेब जाधव, पोलीस अधिकारी सुनील धनवडे, पोलीस अंमलदार व होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यानंतर शिवशक्ती मैदान येथे दंगा काबू प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकात एसआरपीएफ प्लाटूनचे २७ जवान, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे ४० पोलीस अंमलदार तसेच ३७ होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला. संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले.500ईद-ए-मिलाद सण शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी बार्शी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी ४ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार, १ एसआरपीएफ पथक आणि ३७ होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती बार्शी शहर पोलिसांनी दिली.

तसेच सण साजरा करणाऱ्या मंडळांनी “नो डीजे, नो डॉल्बी” या संकल्पनेचा स्वीकार करावा आणि सर्व नागरिकांनी शांतता, सलोखा व सामाजिक सौहार्द कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button