क्रीडा विषयकबार्शीमहाराष्ट्र

बार्शीच्या वुशू खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी; चार पदकांसह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

B1 न्यूज मराठी नेटवर्क 500

बार्शी | मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ : बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी ५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चार पदके पटकावली असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

सोलापूर जिल्हा वुशू असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी श्री. सुशीलकुमार शिंदे स्कूल ऑफ फिजिकल एज्युकेशन, नेहरू नगर, सोलापूर येथे सब-ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांची कमाई केली.500

पदक विजेते खेळाडू

  • कु. संचिती जाधव — सिनिअर ४८ किलो वजन गटात रौप्य पदक
  • कु. समीक्षा राऊत — ज्युनिअर ६० किलो वजन गटात सुवर्ण पदक
  • यशराज रोडे — सिनिअर ८० किलो वजन गटात सुवर्ण पदक
  • कु. अवनी धुमाळ — सब-ज्युनिअर ४८ किलो वजन गटात सुवर्ण पदक

या सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवत बार्शीच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.

या यशामागे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शी चे अध्यक्ष भगवान जाधव सर, जिल्हा वुशू संघटनेचे प्रमुख फुलचंद जावळे सर, उपाध्यक्ष गणेश रोडे सर, सचिव सौ. सविता जाधव, तसेच प्रशिक्षक कु. तेजमाला खबाले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सचिन राऊत, सौ. स्नेहल रोडे, रितेश जानराव, अतुल जाधव, विश्वजीत जाधव, पृथ्वीराज रोडे, सौ. हर्षदा धुमाळ तसेच सर्व पालक आणि प्रशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button