घरकामाच्या आमिषाने विवाहितेला जाळ्यात ओढल्याचा आरोप; टेंभुर्णीत सामूहिक अत्याचार

0

२६ वर्षीय महिलेवर अत्याचाराचा आरोप; पाच जणांविरुद्ध गुन्हा, बार्शी सत्र न्यायालयाकडून पोलिस कोठडी

B1न्यूज मराठी नेटवर्क500

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात २६ वर्षीय विवाहित महिलेला घरकामाचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपींना बार्शी येथील मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीच्या त्रासामुळे घरातून निघून टेंभुर्णी येथे आली होती. पूर्वीच्या ओळखीच्या माध्यमातून तिने घरकाम मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर एका व्यक्तीने तिला घरकामाचे काम असल्याचे सांगून टेंभुर्णी बायपास परिसरातील एका ठिकाणी नेले. तेथे तिची काही व्यक्तींशी ओळख करून देण्यात आली.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सुरुवातीला घरकामाचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतर तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव आणण्यात आला. महिलेने त्यास विरोध केल्यानंतर तिला मारहाण व धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

११ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास महिलेला टेंभुर्णी बायपास परिसरात नेण्यात आले. तेथे तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव आणल्याचे तसेच विरोध केल्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दोन आरोपींनी तिला महामार्गालगत शेतातील आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.500घटनेनंतर आरोपी तिला घटनास्थळी सोडून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर पीडित महिला महामार्ग ओलांडून जवळच्या हॉटेल परिसरात पोहोचली. तेथील नागरिकांनी तिला कपडे देऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर तिने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी लखन तांदळे, शारदा झुरंगे, प्रविण चव्हाण, राखी मल्होत्रा (तृतीयपंथी) आणि बाळू जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या भूमिकेबाबत तसेच घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

न्यायालयीन कारवाई

आरोपींना मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे, बार्शी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत निमगिरे (ब.नं. १७२४) यांनी काम पाहिले.

या गंभीर प्रकरणाचा तपास आयपीएस अंजना कृष्णा, सहाय्यक पोलीस अधीक्षक, करमाळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासादरम्यान घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात असून, पुरावे व जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीतील आरोपांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आरोपी दोषी ठरेपर्यंत त्यांना कायद्यानुसार निर्दोष मानले जाते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या