आरोग्यमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे १४ नवे सदस्य घोषीत

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची घोषणा केली आहे. यामध्ये शासनाने नामनिर्देशित केलेल्या पाच सदस्यांसह नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या नऊ सदस्यांचा समावेश आहे. हे सदस्य अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून पाच वर्षे पदावर राहतील.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतुदींनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.500शासनाने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांमध्ये डॉ. अजय गोविंद केणी, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत नारायण चौधरी, डॉ. राजीव येरवडेकर आणि डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांचा समावेश आहे.

नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या सदस्यांमध्ये डॉ. संतोष अप्पासाहेब कदम, डॉ. संजय साहेबराव कदम, डॉ. निलेश वसंतराव निकम, डॉ. संजय गणेशराव देशपांडे, डॉ. सुनील माधवराव इंगळे, डॉ. अनिलकुमार भास्कर पाटील, डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे, डॉ. उज्ज्वला किशनराव कराड आणि डॉ. अनिल शंकर पाचनेकर यांचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व नवीन सदस्यांचे अभिनंदन केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button