शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश विद्यालयाचा राज्यात डंका; चौथी व सातवीचे 325 विद्यार्थी पात्र

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सुयश विद्यालय, बार्शीने पुन्हा एकदा राज्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत इयत्ता चौथीचे 203 व इयत्ता सातवीचे 122 असे एकूण 325 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, शैक्षणिक गुणवत्तेत सुयश विद्यालयाने महाराष्ट्रात आपले अग्रस्थान कायम राखल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयातील इयत्ता पाचवीचे 116 व इयत्ता आठवीचे 144 असे एकूण 260 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यामुळे दोन्ही स्तरांवरील शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सुयश विद्यालयाने सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
इयत्ता चौथीच्या परीक्षेत विराज आवटे (280), रविराज पायगन (274), अर्णव आवाड (270), रिद्धेश देशमुख (266), ओवी माहुले (264), सक्षम डुमणे (264), आर्या बाशिंगे (262), स्वरूपा देव (260), वीरेंद्रसिंह मोहिते (260) आणि सत्यजित जाले (260) यांनी 260 पेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळविले.
इयत्ता सातवीमध्ये अनय काळे (284), गिरीश देवकर (268), अबूसुफियान आत्तार (264), साईराज पिंगळे (264), सोहम साखरे (262), सोहम स्वामी (262), आदर्श भास्कर (262), अनिश सालसकर (262), अथर्व बांगर (260), ईश्वरी आगलावे (260) आणि सार्थक शिरगिरे (260) यांनी 260 पेक्षा अधिक गुणांची कामगिरी नोंदविली.
विषयनिहाय गुणवत्तेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. इयत्ता चौथीत इंग्रजी विषयात 50 पैकी 50 गुण 40 विद्यार्थ्यांनी, तर गणितात 100 पैकी 100 गुण चार विद्यार्थ्यांनी मिळविले. या विद्यार्थ्यांना श्रीमती अमृता खडसरे (इंग्रजी), श्रीमती ज्योती भोसले (गणित), श्री. संदीप मुंढे (मराठी) आणि श्रीमती आशा जटाळे (बुद्धिमत्ता) यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता सातवीमध्ये इंग्रजी विषयात 50 पैकी 50 गुण 11 विद्यार्थ्यांनी, गणितात 100 पैकी 100 गुण चार विद्यार्थ्यांनी, तर मराठी विषयात 50 पैकी 50 गुण दोन विद्यार्थ्यांनी मिळविले. या विद्यार्थ्यांना श्रीमती अर्चना शेटे (इंग्रजी), श्रीमती विजयालक्ष्मी सुरवसे (गणित), श्रीमती अर्चना माने (मराठी) आणि श्रीमती सोनाली बोंगाळे (बुद्धिमत्ता) यांनी मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर विधानपरिषदचे आमदार राजेंद्र राऊत, संस्थेचे अध्यक्ष शिवदास नलवडे, मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे तसेच प्रसाद नलवडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.




