बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमृत रोहिदास खेडकर यांना “उत्कृष्ट सेवा पदक”

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. १५ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन, निष्कलंक, कर्तव्यनिष्ठ व उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल बार्शी तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे कार्यरत पोलीस हवालदार अमृत रोहिदास खेडकर यांना “उत्कृष्ट सेवा पदक” प्रदान करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हाध्यक्ष दीपक वैद्य, आयुक्त ओंबासे साहेब, CO कुशन जैन, उपमहापौर श्रीमती देवकर यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अमृत खेडकर यांनी पोलीस सेवेत प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव जपत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस सेवेसोबतच त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि फिटनेसच्या माध्यमातून Ironman स्पर्धा पूर्ण करण्यासह K2K (काश्मीर ते कन्याकुमारी) सायकलिंग मोहिमेतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या दीर्घकालीन उत्कृष्ट सेवेला मिळालेला हा सन्मान त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि सेवाभावाची गौरवशाली पावती असून, सोलापूर ग्रामीण पोलीस दल तसेच बार्शी तालुका पोलीस ठाण्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल पोलीस हवालदार अमृत रोहिदास खेडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




