साईसंजीवनी हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन सोहळा उत्साहात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : स्वातंत्र्यदिनानिमित्त साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी येथे झेंडावंदन सोहळा उत्साहात पार पडला. प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. सी. के. मोरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

डॉ. सी. के. मोरे यांनी १५ ऑगस्ट १९८० रोजी बार्शी येथे आपल्या वैद्यकीय सेवेचा प्रारंभ केला. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी जपलेली वैद्यकीय सेवेची समृद्ध परंपरा आजही पुढे सुरू असून, त्यांच्या कुटुंबातील जवळपास १० ते १२ डॉक्टर बार्शी व परिसरात वैद्यकीय सेवा देत आहेत. या वैद्यकीय परंपरेचा वारसा जपणाऱ्या मोरे कुटुंबातील सदस्यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सी. के. मोरे यांनी साईसंजीवनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांचे कौतुक केले. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या विविध वैद्यकीय सेवांबद्दल गौरवोद्गार काढत हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.500या प्रसंगी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राहुल मांजरे-पाटील, साईसंजीवनी हॉस्पिटलचे संचालक सचिन मांजरे-पाटील, डॉ. विजूदादा खुणे, प्रशासकीय अधिकारी परेश मनलोर, डॉ. गणपत मोरे, डॉ. साहिल मोरे, डॉ. चैताली मोरे, डॉ. सचिन मोरे, डॉ. नितीन मोरे, डॉ. प्रसाद मोरे, डॉ. मयूर मोरे, डॉ. निशिकांत मोरे, डॉ. कल्याणी मोरे, राहुल मोरे, दीपक मोरे, अक्षय मोरे, डॉ. प्रथमेश पाटील, डॉ. राजमाने, डॉ. अथर्व, तसेच वृक्षसंवर्धन समिती बार्शीचे अध्यक्ष उमेश काळे उपस्थित होते.

याशिवाय साईसंजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, कर्मचारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या या झेंडावंदन सोहळ्यामुळे हॉस्पिटल परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या