लायन्स क्लब बार्शी रॉयलतर्फे ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या वतीने महात्मा फुले विद्यामंदिर, बार्शी येथे विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धांमध्ये चित्रकला, रंगभरण तसेच English Vocabulary Competition यांचा समावेश होता. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या असून सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदविला.

स्पर्धांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते. पहिला गट इयत्ता १ली ते ४थी आणि दुसरा गट इयत्ता ५वी ते ७वी असा होता. प्रत्येक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना लायन्स क्लब बार्शी रॉयलतर्फे ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.500या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. स्पर्धांचे आयोजन ७, ८ आणि १० ऑगस्ट रोजी करण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभास क्लबचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल, सचिव ला. दयानंद रेवडकर, प्रोजेक्ट चेअरमन ला. नवल बजाज, MJF ला. राहुल माढेकर, माजी अध्यक्ष ला. राजेश खाडे, माजी अध्यक्ष ला. डॉ. तेजस लाड तसेच ला. मनीष रुगले उपस्थित होते.

या उपक्रमासाठी आवश्यक ट्रॉफी व सन्मानचिन्ह उपलब्ध करून देण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन ला. नवल बजाज यांनी क्लबला विशेष सहकार्य केले.

विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता, भाषिक कौशल्य, सर्जनशीलता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या