लाल बावट्याच्या कामगार शेतकऱ्यांचा बार्शीत भव्य मोर्चा
B1नन्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आयटक कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा यांच्या संयुक्त वतीने देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून तहसील कार्यालयावर कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉमेड तानाजी ठोंबरे म्हणाले, “कष्टकरी वर्गाला उध्वस्त कारणासाठी जर सरकार काम करीत आहे कामगार शेतकरी विद्यार्थी तरुण पुढील काळात संयुक्तपणे सरकार विरोधात लढाई चिवट करतील. याचाच एक भाग म्हणून आजचे हे आंदोलन आहे.”
या मोर्चात प्रमुख मागण्या चार श्रम सहीता रद्द करा , तासांचा कामाचा दिवस करा, सर्व कामगारांना किमान वेतन ३००००रुपये करा, संप करण्याचा अधिकार अबाधित ठेवा, स्वामीनाथन आयोग द्या, बार्शीत दुष्काळ जाहीर करा, २०२५ चा पिक विमा द्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या, शिक्षणाचे खाजगीरकरण थांबवा, पंचवीस हजार शाळा बंद करनाचा निर्णय मागे घ्या, ग्रामपंचायत कर्मचारी, शा.पो.आ कर्मचारी , अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर, नगर पालिका कामगार यांना बोनस ,पेन्शन , प्रव्हीडन्ट फंड , शासकीय सुट्या , रजा, गणवेश , आयकार्ड द्या, ग्रामपंचयत कर्मचाऱ्यांना यावलकर समितीच्या शिफारशी लागू करा, अर्धवेळ स्त्रिपरिचर यांना पूर्णवेळ करा, शालेय पोषण आहार करार पद्धत बंद करा , धर्मांध शक्तीना रोखा, बांधकाम कामगार योजना पूर्ववत चालू करा, बार्शी नगर पालिकेने रोज नळाला पाणी सोडा, बेरोजगारांच्या हाताला काम द्या या मागण्या करण्यात आल्या.
या मोर्च्यात अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, जगदाळे मामा हॉस्पिटल संघ, बांधकाम कामगार संघटना, बार्शी नगरपालिका संघटना व आरोग्य स्त्री परिचर संघटना उपस्थित होते. यावेळी कॉमेड ए. बी. कुलकर्णी, लहू आगलावे, प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नखाते, लक्ष्मण घाडगे, आनंद गुरव, बालाजी शितोळे, भारत भोसले, भारत चव्हाण, भारती मस्तूद, रशीन इनामदार, नानासाहेब ठाकरे,बनसोडे, जायलिंगांसकर , अण्णासाहेब ठाकरे, दादा गंगाधर ऋषिकेश शितोळे, सुयश शितोळे दादा काकडे, जयराम आगलावे, राजू ढेंबरे, परमेश्वर नागटिळक आदी उपस्थित होते.





