विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांचा पुण्यात भव्य नागरी सत्कार; सोलापूरकरांचा स्नेह-मेळावा उत्साहात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुणे, दि. १० ऑगस्ट : सोलापूर जिल्हा विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांचा सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासोबतच पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात स्थायिक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा स्नेह-मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत व सौ. कविता राजेंद्र राऊत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूरकरांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली.

स्नेह-मेळाव्याच्या निमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड येथील सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आपल्या मातीतली ओढ, परस्परांतील आत्मीयता आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.500या कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, आमदार सुनील कांबळे, आमदार उमाताई खापरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, बार्शी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रोहित पाटील, नगरसेवक विजय राऊत, बाजार समितीचे उपसभापती बाबा गायकवाड, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे, सुनील जाधव, खडकलगावचे माजी सरपंच दिपक रोंगे, रामभाऊ शेळके, जयदिप खापरे, संचालक रामेश्वर पाटील, भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, सोलापूरकरांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन या मेळाव्यातून घडल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या