कृषीमहाराष्ट्रयोजनासोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना…. पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार सीडिंग तातडीने करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पहिल्या यादीतील 26 हजार 553 पैकी 18 हजार 573 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग चे काम पूर्ण

B1न्यूज मराठी नेटवर्क500

आपल्या जवळच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, बँकेमध्ये यादी प्रसिद्ध केली आहे

सोलापूर, 06 : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार सीडिंग तातडीने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 26 हजार 253 पात्र लाभार्थी यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, सोसायटी आणि बँकेत प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 18 हजार 573 म्हणजेच 70% शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे. अजूनही 7 हजार 690 शेतकरी असे आहेत ज्यांचे आधार सीडिंग बाकी आहे.

आधार सीडिंग बंधनकारक
या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आधार सीडिंग बंधनकारक आहे. आधार सीडिंग केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ खात्यामध्ये जमा करता येत नाही. म्हणून मी सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन करतो की सर्वप्रथम या यादीमध्ये आपले नाव आहे का ते खात्री करावे. आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज आला असेल तो बघावा. आपल्या जवळच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, बँकेमध्ये यादी प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये तपासणी करावी.
500कसे करावे आधार सीडिंग?
“आपले नाव असल्यास लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्यावे. आधार सीडिंग करण्यासाठी आपल्या नावासमोर दिलेला विशेष क्रमांक आणि आधार नंबर घेऊन जवळच्या महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा सरकारी सेवा केंद्र मध्ये गेल्यास विनाशुल्क आधार सीडिंग करून दिले जाईल. आधार झाल्यास लवकरात लवकर लाभ आपल्या खात्यात जमा होईल.”

समस्या असल्यास संपर्क साधा
आधार सीडिंग करताना काही अडचण आल्यास आपण आपल्या तलाठी, मंडल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. प्रशासन आपल्याला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यादीमध्ये काही शेतकरी बांधव मयत झाले असतील, तर त्यांच्या वारस नोंदणी करून घेतल्यास त्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर आधार सीडिंग करून घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून शासनाने दिलेल्या कर्जमाफीचा लाभ त्यांच्या खात्यात लवकर जमा होईल.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button